अकोल्यात औष्णिक विद्युत केंद्रातून होणार ऑक्सिजन निर्मिती; बच्चू कडू यांनी केली पाहणी

bacchu kadu
bacchu kadu

अकोला - अकोल्यातील Akola पारस औष्णिक वीज निर्मिती thermal power plant केंद्र येथे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू Bacchu Kadu यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील ओझोन वायु निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करुन  त्याची अकोला जिल्ह्यात सध्याच्या आपत्तीच्या काळात उपलब्धता करण्याबाबत त्यांनी ही प्रत्यक्ष पाहणी केली. Oxygen will be generated from a thermal power plant in Akola

या ठिकाणी निर्माण होणारा ऑक्सिजन Oxygen हा ओझोन प्रक्रियेसाठी वापरला जात असल्याने निर्माण होणारा ऑक्सिजन हा सिलिंडरमध्ये भरण्याची व्यवस्था येथे नाही. त्यासाठी आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री येथे उभारल्यास येथून ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. यासाठी तातडीने तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाने दिवसभरात पाहणी करुन अहवाल द्यावा,असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी येथे दिले.   

याच परिसरात असलेल्या प्रकल्प विभागाच्या जागेची ५० खाटांचे कोविड केअर सेंटर Covid Care Centre उभारण्यासाठीही त्यांनी पाहणी केली. या जागेत विद्युतीकरण, लाईट, पंखे, पाण्याची सोय आहे. त्यामुळे याठिकाणी हॉल मोकळा करुन रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली तर या जागेचा कोविड केअर सेंटर म्हणून उपयोग करता येईल, त्यासाठी तातडीने स्वच्छता व आवश्यक बाबींची कार्यवाही करावी, अशा सुचनाही बच्चू कडू यांनी महाजेनकोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com