काही केल्या बॅकेचे गैरव्यवहार थांबेना 

काही केल्या बॅकेचे गैरव्यवहार थांबेना 

इंदूर - बॅंकांतील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात असली, तरी त्याला अद्याप म्हणावे असे यश आले नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 18 सरकारी बॅंकांत 32 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची 2,480 प्रकरणे उजेडात आली असून, याचा सर्वाधिक फटका स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (एसबीआय) बसला आहे.

मध्य प्रदेशमधील निमच येथील चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकारांतर्गत रिझर्व्ह बॅंकेकडे याबाबतची माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या एकूण प्रकरणांपैकी 38 टक्के प्रकरणे ही एकट्या "एसबीआय'मध्ये उघडकीस आली आहेत.

दरम्यान, या गैरव्यवहारांचे स्वरूप, तसेच त्यामुळे बॅंका आणि ग्राहकांना नेमका किती फटका बसला, याचा तपशील मात्र आरबीआयने दिलेला नाही.

बॅंकनिहाय झालेले गैरव्यवहार
बॅंक - प्रकरणे - रक्कम (कोटींत)
एसबीआय - 1197 - 12,012.77
अलाहाबाद बॅंक - 381 - 2,855.46
पंजाब नॅशनल - 99 - 2,526
बॅंक ऑफ बडोदा - 75 - 2,297.05
ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स - 45 - 2,133.08
कॅनरा बॅंक - 69 - 2,035.81
सेंट्रल बॅंक - 194 - 1982.27
युनायटेड बॅंक - 31- 1,196.19
कॉर्पोरेशन बॅंक - 16 - 960.80
इंडियन ओव्हसिज बॅंक - 46 - 934.67
सिंडिकेट बॅंक - 54 - 795.75
युनियन बॅंक - 51 - 753.37
बॅंक ऑफ इंडिया - 42 - 517
युको बॅंक - 34 - 470.74
बॅंक ऑफ महाराष्ट्र - 85 - 253.43
आंध्र बॅंक - 23 - 136.27
इंडियन बॅंक - 37 - 37.17
पंजाब अँड सिंध बॅंक - 1 - 2.2 (लाख)


Web Title: Non Transaction Bank
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com