औरंगाबाद डीसीसी बँकेवर फडकला शिवसेनेचा भगवा

Shivsena's Nitin Patil Became President of Aurangabad District Bank
Shivsena's Nitin Patil Became President of Aurangabad District Bank

औरंगाबाद : आज औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Central Cooperative Bank) अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात चार दिवसापूर्वीच शिवबंधन बांधलेल्या नितीन पाटील यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेनंतर तब्बल १०४ व्या वर्षी शिवसेनेला पहिल्यांदा आपली सत्ता आणण्यात यश आले आहे. Nitin Patil of Shivsena Elected President of Aurangabad District Bank

या बँकेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १९१७ ला झाली होती. स्थापनेनंतर १९५७ मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली, तेव्हापासून बँकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खेळी करून काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. शिवाय निवडणुकीत भाजपाला सोबत घेऊन निवडणूक लढवून यश मिळवले. मात्र, भाजपाला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले. आता एकहाती सत्ता शिवसेनेची (Shivsena) असेल तर केवळ नावापुरता राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असणार आहे. 

अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे नेते रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नितीन पाटील यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे (Indian National Congress) जगन्नाथ काळे, शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर आणि शिवसेनेचे अर्जुन गाडे  हे उपाध्यक्षपदात अर्जुन गाडे हे अब्दुल सत्तर समर्थक असल्याने त्यांची निवड नक्की होईल अशी शक्यता आहे. Nitin Patil of Shivsena Elected President of Aurangabad District Bank

मराठवाड्यातील (Marahtwada) सहकार क्षेत्रात फारशी ताकद नसलेल्या शिवसेनेने औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ताब्यात घेतली. औरंगाबाद जिल्हा बँक स्थापनेपासून आणि १९५७ पहिल्यांदा निवडणूक झाल्यापासून औरंगाबाद जिव्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काँग्रेसची सत्ता होती. माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या निधनानंतर बँकेवर माजी आमदार नितीन पाटील हे अध्यक्ष झाले. नितीन पाटील हे दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेले.

मार्च २०२१ मध्ये बँकेच्या संचालक मंडळ आणि सदस्यांची निवडणूक लागल्यानंतर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँक ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या. निवडणुकीत भाजप -शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सोबत घेऊन निवडणूक लढवली. काँग्रेसला बाजूला ठेवले आणि निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष पदाचे दावेदार असलेल्या नितीन पाटील यांना शिवसेनेत आणून बँक शिवसेनेच्या ताब्यात आणली.

काँग्रेस-भाजप असा राजकीय प्रवास करीत माजी आमदार तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत बँकेच्या चाव्या आता सत्ताधाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यासाठी शिवसेनेचे मंत्री सत्तार आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचीही खेळी यशस्वी झाली. Nitin Patil of Shivsena Elected President of Aurangabad District Bank

राज्यात महाविकास आघाडीत सत्तेत असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा बँक निवडणुकीत भाजपसोबत गेले. विशेष म्हणजे बँकेवर सत्ता असलेल्या शिवसेनेला हद्दपार करायचे, या हेतूने सत्तार यांनी खेळी करीत काँग्रेसला आघाडीपासून दूर ठेवले.

माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या गटाला बाजूला ठेवून भाजपचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना निवडणुकीत सोबत घेतले. शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी या पक्षाच्या शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला. मात्र, याच पॅनलचे प्रमुख माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा पराभव झालं. आणि निवडणुकीनंतर नैसर्गिकरित्या भाजप बाहेर फेकली आणि शिवसेनेचा झेंडा उंचावला.

जिल्हा बँक यशस्वी चालवणारे दिवंगत अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यानंतर नितीन पाटील यांना सहकार्य आणि मदत मिळावी म्हणून भाजपचे हरिभाऊ बागडे (Harabhau Bagde) यांनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे मंत्री संदिपान भूमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांना बरोबर घेत मोट बांधली. Nitin Patil of Shivsena Elected President of Aurangabad District Bank

त्यातून शेतकरी विकास पॅनलची स्थापना करण्यात आली, त्यात शिवसेनेचे नेते सत्तार, दानवे, भुमरे सहभागी झाले. शिवसेनेचे दोन मंत्री आणि आमदार शेतकरी विकास पॅनलमध्ये आल्यामुळे शिवसेनेची बाजू अधिक मजबूत झाली. या पॅनलला आव्हान देणारे पॅनल काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांनी उभे केले.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर समर्थक उमेदवारांना त्यांनी हाताशी धरले, शिवाय शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनाही बरोबर घेतले. मात्र, त्यांना यश मिळू शकले नाही. अब्दुल सत्तार यांच्या गटाला तब्ब्ल १४ जागा मिळाल्या तर कल्याण काळे यांच्या गटाला केवळ ६ जागा मिळाल्या.  

राजकारणात कोण कधी कुणासोबत जाईल आणि एकत्र येऊन कोणती समीकरणे तयार करेल हे सांगणे कठीण आहे. तेच औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झाले. कधी कोणी विचारही केले नव्हते, कि शिवसेनेच्या ताब्यात कधीतरी बँक येईल. मात्र, बँक स्थानच्या ७० वर्षानंतर ते शक्य झालं आहे. सहकारात सत्ताधाऱ्यांचा झेंडा अधिक उंच होतो, हे या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आले.

Edited By - Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com