निस्सान मोटर्स करणार साडेबारा हजार कर्मचाऱ्यांची कपात

निस्सान मोटर्स करणार साडेबारा हजार कर्मचाऱ्यांची कपात

नवी दिल्ली: निस्सान मोटर ही जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करणार आहे. निसान 2022 पर्यत जागतिक पातळीवर 12,500 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहेत.

कंपनीच्या विक्रीत झालेली घट, वाढता उत्पादन खर्च यामुळे खर्चात कपात करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलणार आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक झालेल्या निस्सान मोटर्सचे अध्यक्ष कार्लोस घोन यांच्या प्रकरणातून सावरण्याचाही निसानचा प्रयत्न सुरु आहे. 

निस्सानच्या नफ्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल 98.5 टक्के घट झाली आहे. निसानला फक्त 160 कोटी येनचा (1.48 कोटी डॉलरचा) नफा झाला आहे.

निसान जपानची दुसऱ्या क्रमांकाची ऑटोमोबाईल कंपनी आहे. उत्तर अमेरिकेत कंपनीच्या व्यवसायावर मोठाच परिणाम झाला आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांना तोंड देताना वाहनांच्या किंमती आटोक्यात ठेवताना कंपनीला मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागते आहे. 

WebTitle : nissan motors to do cost cutting due to low profits  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com