अकोल्यात खत दरवाढ विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

ncp andolan
ncp andolan

अकोला - खत दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा Central Government निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने NCP आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शेतकऱ्यांची Farmer आर्थिक पिळवणूक केंद्र सरकार या माध्यमातून करीत असल्याचा आरोप करत  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन  Andolan करण्यात आले. NCP's agitation against fertilizer price hike in Akola

एन खरिपाच्या वेळी केंद्र सरकारने खत दरवाढ केली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. आधीच संचारबंदीच्या Curfew काळात शेतकऱ्यांचा माल विकल्या गेला नाही. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आहेत. त्यात केंद्र सरकार खत Fertilizer दरवाढ करून शेतकऱ्यांना शेतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आधीच शेतीमालाचे भाव वधारलेले आहे. त्यात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही आहे. परिणामी, शेतकरी शेती करताना बुडत आहे. कृषी प्रधान देशात कृषी वरील सबसिडी बंद करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. या निदर्शनात पक्षाचे सर्वच आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 हे देखील पहा -

तर दुसरीकडे धुळ्यात केंद्र सरकारच्या या भाववाढ विरोधामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे शिंदखेडा तहसील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही दरवाढ रोखण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तसेच तहसील कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या खतांच्या दरवाढीचा घोषणाबाजी करीत निषेध देखील केला आहे. NCP's agitation against fertilizer price hike in Akola

त्याचबरोबर साक्री तालुक्यातील कृषी कन्येने व काही महिलांनी आपली शेती केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विकायची आहे असे फलक हातात धरून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध केला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने तीन वर्षांसाठी आमच्या जमिनी करार तत्वावर घेऊन नफ्याची शेती करून दाखवावी असा देखील उल्लेख निवेदनात करीत हे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.  

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com