क्रीडा म्हणजेच तंदुरुस्ती : नरेंद्र मोदी

क्रीडा म्हणजेच तंदुरुस्ती : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : तुमच्यातील विद्यार्थी जागा आहे आणि म्हणून विविध वयोगटातील माणसे इथे उपस्थित आहे. आपल्या फीटनेस, क्षमता आणि कौशल्याने ज्यांनी संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले अशा मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो. फीट इंडिया या कल्पनेचे चळवळीत रुपांतर करण्यासाठी मी क्रीडा मंत्रालयाचे अभिनंदन करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत मिशन फिट इंडियाची घोषणा केली. 

इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात विविध प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या प्रात्यक्षिकांमधील प्रत्येकी दोन गोष्टी जरी आपल्याला अंगीकारता आल्या तरी आपण तंदुरुस्त होऊ. खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी आहे आणि म्हणूनच मिशन फिट इंडियाला एका जनआंदोलनाचे रुप द्यायचे आहे. 

प्रत्येकी वेळी कठोर परिश्रम करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव मोठे करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आभार मानन्याचा हा दिवस आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरात क्रीडाला प्रोत्साहन मिळाले आणि त्याचा निकाल आपण पाहतो आहे. क्रीडा म्हणजेच तंदुरुस्ती. फिटनेस हा केवळ एक शब्द नसून स्वस्थ आणि समृद्ध जीवन जगण्य़ाचा मंत्र आहे, असे म्हणत त्यांनी सर्वांना फिट राहण्याचे आवाहन केले. 


Web Title: Narendra Modi address nation on National Sports Day 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com