पूर्व विदर्भातील धानाच्या मुद्द्यावरून नाना पटोलेंचा केंद्र सरकारवर आरोप 

nana patole 1.jpg
nana patole 1.jpg

भंडारा :  पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया Bhandara -Gondia शेतकऱ्यांनी पिकवत असलेला धान Paddy  तांदूळ खाण्यायोग्य नाही, असे प्रमाणपत्र केंद्र सरकार दिले असल्याच्या खळबळजनक आरोप कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress State President Nana Patole यांनी केला आहे, ज्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने असे कारण देत धान नाकारल्यामुळे आता भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील लोक, शेतकरी, कामगार हे जिल्ह्यात पिकविलेला धानाचा तांदळाचा भात खातात. तरी सुद्धा जिल्हयातील लोकांना कोणतेही अपाय झाले नाहीत. मात्र केंद्र सरकारने कोणत्या निकषाख़ाली 111 तांदळाचे (तांदळाचा एक प्रकार) धान फेल केले. असा सवालच नाना पटोले यांनी केला आहे.  (Nana Patole accuses the central government over the issue of grain in East Vidarbha) 

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे परिणाम मात्र पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. केंद्राने अद्यापही पावसाळ्यात पिकलेले आणि खरेदी धान अद्याप केंद्र सरकारने खरेदी केलेले नाही. ही धान अद्यापही राज्य सारकरांच्या गोंदमांमध्ये पडून आहे. ज्यामुळे केंद्र सरकारने चक्क जिल्ह्यातील धान नाकारल्यामुळे आता जिल्हात्तील धानाला उठाव कधी मिळणार या चिंतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आपण पिकवलेला धान आता खरेदी होणार की तसाच पडून राहिल यांची चिंता आता शेतकऱ्यांना पडली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. 

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस खोटारडे असून भाजप सरकारने ओबीसी समजाचे मुडदे पाडले असल्याचा आरोप नाना पाटोळे यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता,  तेव्हा मंत्री मोर्चे काढत बसले होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.   2017 च्या बिहार निवडणुकी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण रद्द व्हावे असे वक्तव्य केले होते,  पंतप्रधान हे स्वतः संघाचे  प्रचारक राहिले असून आरक्षणाचा विरोध करणारी व्यवस्था त्यांनी निर्माण केली आहे. आम्ही ओबोसीचे हितचिंतक आहोत. अशी भूमिका भाजपने घेतली असली तरी ओबीसी समाजाने यांना ओळखल असून ओबीसी समाज  भाजपला त्यांची जागा लवकर दाखवणार  असल्याचे नाना पाटोले यांनी म्हटले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com