मुंबईसह 39 मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ

मुंबईसह 39 मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ

हक्काचं घर घेण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी धक्का देणारी एक बातमी. मुंबईसह 39 मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली असून त्यामुळे सर्वसामान्यांसाठी घर खरेदीकरणे आवाक्याबाहेरचे झालंय. नॅशनल हौसिंग बँकेच्या हौसिंग प्राइस इंडेक्समधून ही माहिती समोर आलीय. मार्च तिमाहीत पुणे वगळता देशातील सर्व बड्या शहरांमधील घरांच्या किंमतीत वाढ झाल्याचं आढळून आलं आहे.

उलट पुण्यात घरांचे दर १.४ टक्क्यांनी घसरल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. इंडेक्सनुसार चेन्नई आणि चाकणमध्ये घरांच्या किंमतीत ०.७ टक्के किरकोळ वाढ झाली आहे. तर गुजरातच्या गांधी नगरमध्ये घरांच्या किंमतीत काहीच बदल झालेला नसल्याचंही या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. 

मार्च तिमाहीच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये घरांच्या किंमतीत सर्वाधिक ९.४ टक्क्याने वाढ झालीय तर याआधी डिसेंबर तिमाहीत ३२ शहरांमधील घरांच्या किंमतीत वाढ झाली होती. तर १० शहरांमधील घरांच्या किंमती घसरण झाली होती आणि ५ शहरांतील घरांच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नव्हता. या मार्च तिमाहीत ३९ शहरांमध्ये घरांच्या किंमतीत वाढ झाली असून ८ शहरांमधील घरांच्या किंमतीत घसरण झाल्याचं आढळून आलंय.

इतर ८ शहरांतील घरांच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नसल्याचं दिसून आलंय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com