MNS MLA Raju Patil
MNS MLA Raju Patil

मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये: 'या' आमदाराने केले ट्विट.....

डोंबिवली : दोन दिवसापूर्वी मनसेने (MNS) कल्याण डोंबिवली संथ गतीने  सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या निषेधार्थ ठाकुर्ली पुलावर कमी कार्यकर्त्यांमध्ये निषेधात्मक आंदोलन (Agitation)  केलं होतं. या आंदोलनानंतर मनसे जिल्हाध्यक्षासह कार्यकर्त्याविरोधात कोरोना (Corona) नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील (MLA) यांनी ट्विट (Tweet) करत करत इशारा दिला आहे. Case registered against the MNS workers in Dombivali.

मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत म्हणतात "डोंबिवलीत मनसैनिकांनी पुलांची कामं संथगतीने चालू आहेत म्हणून आंदोलन केल्यामुळे गुन्हे दाखल केले. मग आयुक्त आणि डिसीपी विवेक पानसरे यांच्या उपस्थितीत वडवली पुलाचे उद्घाटन झाले यावेळी झालेली गर्दी तसेच कोपर पुलाच्या गर्डर लॉन्चिंगला  गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार?'' 

मनसेला ‘कोणीही’ गृहित धरू नये. प्रशासनाने (Administration) सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनून राहू नये. पोलिसांबद्दल (Police) नेहमीच आदर आहे परंतु त्यांनीही पक्षपातीपणा करू नये ही अपेक्षा आम्ही पण करतो. तर मनसे जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश भोईर यांना कोरोना प्रादुर्भाव मनसेमुळेच होतो का असा सवाल त्यांनी केला आहे. MNS MLA Raju Patil Warns against Action on Party Workers

या आंदोलनाच्या माध्यमातून कोरोनाच्या नियमांचे पालन करत लोकांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता. मनसे पोलिसांसोबत आहे, मात्र न्याय सगळ्याना समान असावा. याबाबत आता पोलिसांनी मात्र बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे वडवली पुलाच्या वेळी झालेल्या गर्दीवर पोलिस गुन्हे दाखल करणार का हे पाहावे लागेल.. Case registered against the MNS workers in Dombivali.

Edited by- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com