मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

amit
amit

राज्यात आता कोरोनाच्या  Corona दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुंगांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सर्वसामान्य जनता, राजकाणी Politician ते सेलिब्रेटी Celebrity सर्वांना कोरोना संसर्गाने विळखा घातला आहे. mns leader Amit Thackeray corona positive

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांचे सुपुत्र अमित ठाकरे Amit Thackeray यांना कोरोनाची Corona लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने अमित ठाकरे यांनी कोरोना  चाचणी केली होती त्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात lilavati hospital दाखल करण्यात आले आहेे.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांच्या पत्नी रश्मी ठाकरे Rashmi Thackeray आणि त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. अमित ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. खबरदारी म्हणून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.mns leader Amit Thackeray corona positive

अमित ठाकरे यांच्यावर  रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपचार केला जात आहे. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले असून  घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली आहे.   

अमित ठाकरे  गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेच्या कामातही सहभागी होत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडियातून कोरोनाबाबत जनतेला आवाहन केलं होतं. ''माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, आपल्या व्हॉट्सअॅप, फेसबुकवर ‘कृपया’मृत्यूच्या बातम्या, स्मशानातील फोटो, व्हिडीओ, शवागरातील मृतदेहांचा खच असलेले फोटो, व्हिडिओ कृपा करून शेअर करू नका, तुम्हाला आले तर ते एक तर तुमच्याकडेच ठेवा अन्यथा डिलीट करा, पण व्हायरल करून लोकांच्या मनातील भीती आणखी वाढवू नका, असे अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर म्हटले होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com