खुशखबर ! 'एलआयसी'मध्ये होणार मेगाभरती

खुशखबर ! 'एलआयसी'मध्ये होणार मेगाभरती

पुणे - भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात "एलआयसी'मध्ये देशभरात सुमारे आठ हजारांहून अधिक "असिस्टंट क्‍लार्क' पदांसाठी भरती होणार आहे. युवकांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी पूर्व आणि मुख्य अशा दोन परीक्षा होतील. परीक्षेनंतर मुलाखत द्यावी लागणार नाही. "एलआयसी'मध्ये 1995 नंतर होणारी ही सर्वांत मोठी भरती आहे.

असिस्टंट पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे. नियमांनुसार मागासवर्गियांसाठी वयामध्ये सवलत आहे. किमान शैक्षणिक पात्रता कोणत्याही विषयातील पदवी ही आहे. असिस्टंट पदाच्या पूर्व परीक्षेसाठी रिझनिंग ऍबिलिटी, न्यूमरीकल ऍबिलिटी आणि इंग्रजी हे विषय असतील. ही परीक्षा ऑनलाईन होणार असून, परीक्षेसाठी दोन तास इतका कालावधी आहे. बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे असे परीक्षेचे स्वरूप आहे. परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा www.licindia.in/careers या लिंकवर उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एक ऑक्‍टोबर 2019 ही आहे. महाराष्ट्रासह मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, पणजी, ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. असिस्टंटपदी निवड झाल्यावर सुरवातीचा पगार दरमहा सुमारे 30 हजार रुपये तसेच घरभत्ता, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत.

Web Title: Mega Recruitment in LIC

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com