सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या !

beed
beed

बीड  - बीडच्या Beed पाटोदा Patoda तालुक्यात हुंडाबळी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार Car घेण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये घेऊन ये म्हणणाऱ्या, सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून, 21 वर्षीय विवाहिततेने सॅनिटायजर Sanitizer प्राशन करून आत्महत्या Suicide केलीय.

पूजा गणेश रायकर वय 21 असे मयत विवाहितेचे नाव आहे. मात्र, या विवाहितेने विषारी द्रव प्राशन केल्याचे उघड होऊ नये व शवविच्छेदन Postmortem टाळण्यासाठी सासरच्यांनी चक्क तिचा कोरोना Corona पॉझिटिव्ह Positive असल्याचा बोगस रिपोर्ट Report बनवला.

 हे देखील पहा -

मात्र माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला आणि शवविच्छेदन पार पडले. तर याविषयी मयत पूजाचे वडील बिभीषन शेवाळे यांनी पोलिसात Police दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, की पूजाचा विवाह दोन वर्षापूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत झाला होता.

गणेश पुण्यात एका खाजगी वाहतूक कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दिड वर्ष चांगले गेले. त्यानंतर तुला अजूनही मुलबाळ होत नाही. असे पती गणेश, सासरा शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजुबाई हे सतत तिला म्हणू लागले. कार घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये घेऊन ये, असा तगादा देखील तिच्यामागे लावला होता.

सहा महिन्यापूर्वी पूजाच्या आई-वडिलांनी, आर्थिक परिस्थिती बिकट असून, आणखी एका मुलीचे लग्न करायचे बाकी आहे, पैसे आल्यास आम्ही तुम्हाला गाडीसाठी पैसे देऊ.असे पूजाच्या सासरच्यांना सांगितले होते. 

तर एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे  Lockdown गणेश पूजासह गावी धनगरजवळका येथे परतला. तिथे आल्यावर त्याने आई-वडिलांच्या मदतीने कारच्या पैशासाठी पूजाला सतत मारहाण, शिवीगाळ करून छळ सुरु केला. तिला उपाशी ठेवू लागले. सततचा छळ असह्य झाल्याने पूजाने 19 मे च्या दुपारी 3 वाजता वडिलांना शेवटचा कॉल केला आणि त्यानंतर तिने सॅनिटायजर प्राशन केले.

तिला अत्यवस्थ अवस्थेत अहमदनगर Ahmednaagr येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २५ मे ला रात्री 8 वाजता, गणेशचा मावस भाऊ नामदेव हरिभाऊ सुडके हा रुग्णवाहिका घेऊन तिथे आला.

पुण्यात Pune माझी लॅब असल्याने खाजगी रुग्णालयात Hopsital माझे संबंध आहेत, उपचार चांगले होतील. असे म्हणत त्याने पुजाला नेऊन, पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. तिथे बुधवारी २६ मे रोजी पहाटे ४ वाजता पूजाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

परंतु पूजाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड होईल. हे चाणाक्ष नामदेवच्या लक्षात आले. नियमानुसार कोरोना रुग्णांचे शवविच्छेदन करत नाहीत. त्यामुळे शवविच्छेदन टाळण्यासाठी, नामदेवने स्वतःच्या लॅबमध्ये पुजाची कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचा खोटा लेखी अहवाल रुग्णालयाला सादर केला.

परंतु, पूजाच्या माहेरच्या लोकांना हा अहवाल मान्य नसल्याने, त्यांनी दुसरीकडे पुजाची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आणि सर्व प्रकार समोर आला. पूजाचा मृतदेह नातेवाईकांना मिळाला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

याप्रकरणी पूजाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिचा पती गणेश, सासरा शिवाजी, सासू विजुबाई आणि मावस भाऊ नामदेव सुकडे याच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ आणि आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतले आहे.त्या दोघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. तर, सासू आणि कोरोना चाचणीचा बोगस अहवाल आणून देणारा मावस भाऊ अद्याप फरार असून तपास सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com