राष्ट्रवादीने मनधरणीचे आटोकाट प्रयत्न करुनही अजित पवार भाजपसोबतच...

राष्ट्रवादीने मनधरणीचे आटोकाट प्रयत्न करुनही अजित पवार भाजपसोबतच...

मुंबई : राष्ट्रवादीवने आटोकाट प्रयत्न केले अजित पवारांचे मन वळवण्यासाठी मात्र त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरलेले दिसतायत. कारण त्यांनी ट्विटरद्वारे भाजपा नेत्यांचे आभार मानले आहेत. भाजपाला साथ दिल्याबाबत नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या याचवेळी कोणालाही काहीही प्रतिक्रीया न देणारे अजित पवारांनी बऱ्याच वेळानंतर ट्विटवर सक्रीय झालेत. 20 मीनिटांत तब्बल 21 ट्विट अजित पवारांनी केलेत. याचवेळी त्यांनी स्वताचं ट्विटर अकाउंटवरुन त्यांचे पदही बदलले आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपलं अकाऊंट बदललं. मात्र पक्षाचं पद हे राष्ट्रवादीचंच असल्याचं दिसतंय. त्यामुळे वेगवेगळ्या तर्कांना वाट निघतेय. 

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1198549352396013568

हे ही वाचा...

 राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत... तत्पूर्वी जयंत पाटलांनी राजभवनवर हजेरी लावत, 51 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र कार्यालयात सुपूर्द केलं... राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाचाही समावेश आहे.. मात्र अजित पवारांच्या नावापुढे त्यांची सही नसल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.. तसंच अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय न झाल्याचंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे हे अजित पवार यांची मनधरणी करून घराबाहेर पडले आहेत.. अजित पवार यांना निर्णय बदलावा अशी विनंती काळे यांनी पावारांनी केलीय.. त्यासोबतच भाजपनेसुद्धा दोन आमदार पाठवल्याचा आरोप काळेंनी केलाय..

दिलीप वळसे पाटील अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी ते अजित पवारांच्या भेटीला गेलेत. शरद पवारांच्या भेटीनंतर ते अजितदादांची भेट घेण्यासाठी आलेत... या भेटीत अजित पवारांची मनधरणी करण्याचा ते प्रयत्न करत आहेत असं बोलंल जातंय. तर काल देखील अजित पवारांच्या मनधरणीचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न केले.. काल दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबर, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांनी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी अजित पवारांच्या भेट घेतली होती... तर सध्या दिलीप वळसे पाटील अजित पवारांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती मिळत आहे. 

Web Title - ajit pawar says thanks to all bjp leaders who congratulates him 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com