पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर

 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर

पुणे  : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भाजपने या उमेदवार यादीची घोषणा केली. बारामती मतदारसंघातून भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. 

कुल या रासपचे आमदार राहूल कुल यांच्या पत्नी आहेत. बारामतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध कुल असा सामना होईल.

पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना पक्षाने घरी बसविले आहे. पुण्यात बापट यांनाच उमेदवारी मिळणार हे सराकारनामाने यापूर्वीच प्रसिद्ध केले होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. तर, बारामतीत सुप्रिया सुळे यांना रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कडवी लढत देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दिंडोरी या राखीव मतदारसंघातून डॉ. भारती पवार, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर आणि जळगावमधून स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

Web Title: Girish Bapat BJP candidate in Pune Loksabha constituency

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com