औरंगाबादमध्ये का बंद आहे मोबाईल आणि इंटरनेट सेवा?

औरंगाबादमध्ये का बंद आहे मोबाईल आणि इंटरनेट सेवा?

देशाच्या अनेक भागांत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरूय. त्यामुळे अनेक ठिकाणी मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. औरंगाबादमध्ये मात्र, अशी कोणतीही परिस्थिती नसताना तिथली मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद पडलीय.

अचानक मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद पडल्यानं औरंगाबादचे रहिवासी वैतागलेत. पैसे भरूनही मोबाईलसेवा मिळत नसल्यानं त्यांची चिडचिड होतेय. औरंगाबाद महापालिकेनं तिथले मोबाईल टॉवरच सील केलेत. त्याचा परिणाम शहराच्या अनेक  भागांत दिसतोय.

औरंगाबादेत 595 मोबाईल टॉवर आहेत..त्यातले केवळ 61 अधिकृत आहेत. उरलेल्या अनधिकृत 534 टॉवरमधून महापालिकेला काहीही उत्पन्न मिळत नाही. वास्तविक त्यातून आतापर्यंत 37 कोटी मिळणं अपेक्षित होतं. मात्र, काहीच न मिळाल्यानं अखेर ही कारवाई करण्यात आलीय.

मोबाईल कंपन्या स्वतःच्या तुंबड्या भरत आहेत. मात्र, या सेवेसाठी लागणाऱ्या टॉवरचा कर भरत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई योग्यच. तरीही सामान्य नागरिकांचा विचार करून ही सेवा सुरक्षीत करणंही आवश्यक आहे.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://www.youtube.com/watch?v=HLSD_Eog4_Q

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com