जय श्री रामाने सुरु झालेला वाद नेमका कुठे थांबणार ? 

जय श्री रामाने सुरु झालेला वाद नेमका कुठे थांबणार ? 

पश्चिम बंगालमध्ये जय श्री रामाने सुरु झालेला वाद नेमका कुठे थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय. ममता बॅनर्जी आणि मोदी हा वाद दिवसेंदिवस शिगेला पोहोचतोय. त्यात भाजपनं पश्चिम बंगाल सरकारविरोधात मोर्चा काढलाय, या मोर्चा दरम्यान जोरदार हंगामा झालाय. भाजपचे आमदारही या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर हंगामा झालाय. या मोर्चावर पोलिसांकडून पाण्याचा फवारे मारण्यात आले तर अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती शासन लागू करण्याची तयारी केंद्रात सुरु असल्याची चर्चा सुरुय. बंगालचा गुजरात करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असल्याचे आरोप ममतांनी केलेत. राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेल्या भेटीवर त्या आपली प्रतिकिया देतांना बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचं सत्र सुरुच आहे. यातल्या मृतांचा आकडा आता १५ वर गेलाय. हा वाद लवकर शमावा आणि धुमसतं पश्चिम बंगाल शांत व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. 

Web Title : marathi news west Bengalconflict over jai shree ram bjp and tmc 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com