ऐकावं ते नवलच! वाघ शेतात, शेतकरी पिंजऱ्यात

ऐकावं ते नवलच! वाघ शेतात, शेतकरी पिंजऱ्यात

वाघासाठी शेतकरी पिंजऱ्यात शिरलाय. होय हे खरंच घडतंय. याची सुरुवात जरी गुजरातमध्ये झाली असली तरी ही दहशत महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचली आहे. शेतकऱ्याच्या मनातली दहशत आता गावागावातल्या प्रत्येक माणसासोबतच शहरांतल्या प्रत्येकाच्या मनातही निर्माण झाली आहे. 

वाघासाठी शेतकरी पिंजऱ्यात

दहशतीच्या पिंजऱ्यात सध्या शेतकरी बंदीस्त झालाय. वाघ, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांची दहशत सध्या वेगानं पसरतेय. या दहशतीने शेतकऱ्याला पिंजऱ्यात कोंडलंय. शेताची राखण करणारा शेतकरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पिंजऱ्यात शिरलाय. माणसांच्या जीवावर उठलेल्या या वाघ-बिबट्याची दहशतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 

दहशतीने शेतकरी बंदिस्त

वाघ-बिबट्या शेतात आणि शेतकरी पिंजऱ्यात अशी अवस्था झालीए. पण जिवाला घाबरलेल्या शेतकऱ्यासमोर दुसरा पर्यायच उरलेला नाही. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशेतल्या इतरही राज्यात काही वेगळं चित्र नाही. 

गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये तर याहून वाईट परिस्थिती आहे. अमरेली आणि जुनागडमध्ये शेता-शेतात हेच दृश्य दिसतंय. कारण अवघ्या तीन दिवसांत इथे बिबट्याने दोन शेतकऱ्यांचा जीव घेतलाय. 8 महिन्यांत 17 लोक जीवाला मुकलेत. तर 50 जण जखमी झालेत.

वाघ शेतात, शेतकरी पिंजऱ्यात

150 वनकर्मचारी, शार्पशूटरची 8 पथकं आणि 30 पिंजरे या चालत्या फिरत्या मृत्यूचा मागोवा घेतायत. पण हा मागोवा संपेपर्यंत शेतकऱ्याच्या जीवात जीव येणं कठीण आहे. माणसाने प्राण्यांचं जंगल बळकावलं.. स्वतःच्या आनंदासाठी उद्यानांत, सर्कशीत त्यांना पिंजऱ्यात कोंडलं आणि आता तीच अवस्था माणसाची झाली आहे जोवर निसर्गाचं चक्र पूर्ववत होत नाही. तोवर अशा पिंजऱ्यांविना माणसापुढे तरणोपाय नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com