टकटक वाजलं, कुणाला लुटलं? बोरिवलीत चोर-पोलिसाचा खेळ

टकटक वाजलं, कुणाला लुटलं? बोरिवलीत चोर-पोलिसाचा खेळ

तुमच्या कारजवळ पैसे पडलेत..टायर पंक्चर झालाय असं सांगून कोणी लक्ष वेधून घेत असेल किंवा तुमच्या कपड्यांवर घाण  पडलीय, बाजूला जाऊन स्वच्छ करून येऊया असं म्हणत असेल तर तिकडे लक्ष देऊ नका. कारण टकटक गँग तुम्हाला गंडा घालू शकते.पोलिसांनी अशा एका टोळीला जेरबंद केलंय.

नेमकं असं काय झालं?

रस्ता होता मुंबईतल्या बोरिवलीचा. रिक्षात बसलेल्या एकाचा पोलिसांना संशय आला. त्याला काही विचारण्याच्या आतच त्यानं धूम ठोकली आणि हा थरार रंगला. मुंबईच्या रस्त्यावर भर ट्रॅफिकमध्ये चोर-पोलिसांचा थरार रंगलाय. बोरिवलीतल्या गजबजलेल्या रस्त्यावर कारवाई केलेल्या पोलिसानं ज्याच्या मुसक्या आवळल्यात तो आहे, टकटक गँगचा मेंबर.

या धाडसी कारवाईसाठी पोलिसांचं कौतुक होतंय. पोलिस कॉन्स्टेबल मेहेर आणि गाढवे यांनी केलेल्या या कामगिरीसाठी अप्पर पोलिस आयुक्तांकडून बक्षीसही जाहीर केलंय. पण नेमकी ही गँग काम करते तरी कसं?

कसं चालतं टकटक गँगचं काम?

नागरिकांचं लक्ष विचलित करून त्यांना लुटणं ही त्यांची कार्यपद्धती. एखाद्या वाहनचालकाचं लक्ष कारच्या काचेवर टकटक करून वेधतात...कारचालकानं दार किंवा काच उघडली की गँगचे अन्य सदस्य बाजूच्या अथवा मागच्या सीटवरच्या वस्तू लांबवतात..कधीकधी एखाद्याच्या अंगावर घाण पडल्याचं सांगतात आणि कपडे स्वच्छ करण्याच्या बहाण्यानं वस्तू चोरतात. प्रामुख्यानं लहान मुलांचा वापर या टोळ्यांकडून केला जातो.टोळीला ते कंपनी म्हणतात. म्होरक्याला भाई म्हणतात. त्यांचा मुख्य चोरटा असतो, त्याला मशिन तर मोबाईल फोनला कौआ म्हणतात.

पोलिसांनी या टोळीतल्या चोरट्यांना अटक केलीय. मात्र, स्वतः नागरिकांनीही सावधगिरी घेतली तर या चोऱ्यांना नक्कीच आळा बसेल. त्यामुळे भविष्यात जर कुणी टकटक केलं तर लगेच सावध व्हा. सतर्क राहा. आणि साम टीव्हीच्या बातम्या वाचून अपडेट राहा. 

Web Title - ​Terror of taktak gang 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com