स्विस बँक 50 खातेधारकांची नावं देणार; स्वीस बँकेत कुणा कुणाचे पैसे?

स्विस बँक 50 खातेधारकांची नावं देणार; स्वीस बँकेत कुणा कुणाचे पैसे?

काळ्या पैशांच्या मुद्यावर आता स्विस बँकेंनंच खातेधारकांविरोधात फास आवळायला सुरूवात केलीय. यात एक दोन नव्हे तर 50 भारतीयांच्या नावांचा समावेश आहे. स्विस सरकारनं या खातेधारकांची माहिती भारत सरकारला देण्याची प्रक्रिया सुरू केलीय. काळ्या पैशांच्या मुद्यावर भारत सरकार आणि स्विस सरकार यांच्यात एक करार झालाय आणि त्यानुसारच या बँकांमध्ये कुणाचे किती पैसे आहेत हे जाहीर करण्याचं स्विस बँकेनं मान्य केलंय. 

स्विस बँकेत भारतातल्या अशा लोकांची खाती आहेत. ज्यांनी इथल्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलीय. या उद्योजकांनी मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये स्वताचं बस्तान बसवलंय. बऱ्याच जणांनी डमी कंपन्यांना बनवून मोठा आर्थिक लाभही मिळवलाय. यातल्या काही लोकांची नावं पनामा सूचीतही आहेत. तर काहींवर ईडीची करडी नजर आहे. 

स्विस सरकारनं आपल्या नियमानुसार नावाच्या ऐवजी काही अद्याक्षरं सांगितली आहेत. उदाहरणार्थ एनएमए, एमएमए, पीएएस, आरएएस, एबीकेआई, पीएम, एडीएस, जेएनवी, जेडी, एडी. याशिवाय खातेधारकाची राष्ट्रीयत्व आणि जन्मतारिख देखील सांगण्यात आलीय.  

WebTitle : marathi news swiss bank to share names of indian account holders black money

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com