सुप्रिया लाखानं जिंकल्या, पार्थ लाखानं हरले

सुप्रिया लाखानं जिंकल्या, पार्थ लाखानं हरले

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा पुरता धुव्वा उडालाय. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. देशात उसळलेल्या मोदी त्सुनामीतही शरद पवारांनी आपला बारामतीचा गड राखला. बारामतीमधून सुप्रिया सुळे तब्बल १ लाख ५४ हजार ५०० मतांनी विजयी झाल्यात. त्यांनी भाजपच्या कांचन कुल यांना पराभवाची धुळ चारलीय

बारामतीत राष्ट्रवादीने विजयाचा जल्लोष केला पण मावळमध्ये मात्र सुप्रिया सुळेंचे भाचे पार्थ पवारांचा दारुण पराभव झालाय. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा सुमारे दोन लाख मतांनी पराभव केलाय. पार्थ पवारांसाठी त्यांचे वडिल आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली ताकद पणाला लावली होती. मात्र, ते आपल्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. पार्थच्या आजोबांनी मात्र नम्रपणे हा पराभव स्वीकारलाय. 

शरद पवार  गेली ५० वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत १५ निवडणूका लढवल्यात. मात्र गेल्या ५० वर्षात त्यांचा एकदाही पराभव  झालेला नाही. ऐवढंच काय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनीही आतापर्यंत पराभव पाहिला नाही. मात्र, पार्थच्या रूपानं पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागलीय. त्यामुळं पार्थ पवारांचा पराभव हा पवार कुटुंबासाठी मोठा धक्का मानला जातोय

WebTitle : marathi news supriya sule won by almost one lakh votes parth pawar lost by almost a lakh of votes 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com