शिवसेना आणि भाजपच्या विद्यमान आमदारांच्या मनातली धडधड आता चांगलीच वाढलेय. त्याचं कारणही तसंच आहे. दोन्ही पक्षातल्या आमदारांवर सध्या तिकीट कापलं जाण्याची टांगती तलावर आहे. त्यामुळे तिकीटवाटप होईपर्यंत तरी ही धाकधूक कायम राहणार आहे.
शिवसेनेच्या कोअर कमिटीने तिकीट कापण्यासाठी आमदारांची यादी बनवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची धास्ती वाढली आहे.
तर तिकडे शिवसेनेच्या मित्रपक्षातही परिस्थिती काही वेगळी नाहीए...विविध कारणांमुळे भाजपचे विद्यमान आमदारही धास्तावलेत.
शिवसेना भाजपची युती होणार का? या प्रश्नाचं उत्तरही अद्याप मिळायची आहेत. त्यामुळे जागावाटबद्दलही अजून चित्र स्पष्ट नाही. अशात आणखी काही दिवसतरी दोन्ही पक्षातले विद्यमान आमदार गॅसवरच राहणार आहेत.
WebTitle : marathi news shivsena bjp ticket distribution many seating MLA may not get ticket for vidhansabha
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.