Uddhav Thackeray Press Conference, Shivsena , Maharashtra , Mumbai , Uddhav Thackeray On Ayodhya verdict
Uddhav Thackeray Press Conference, Shivsena , Maharashtra , Mumbai , Uddhav Thackeray On Ayodhya verdict

VIDEO | अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे कोणती आनंदाची बातमी देणार ?

सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक अशा अयोध्या केसचा निकाल दिलाय. निकाल आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आजचा दिवस हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे . मी न्यायदेवतेला दंडवत घालतो. मी मागच्या वर्षी 24 तारखेला अयोध्येत जाऊन शरयू नदीचीही पूजा केली होती. मी तिथे जाताना शिवनेरीवरून महाराष्ट्रातील, शिवाजी महाराजांच्या भूमीतील माती तिथे घेऊन गेलो होतो. मला विश्वास होता शिवरायांच्या भूमीतील मातीमुळे एक चमत्कार घडेल. मी येत्या दोन ते तीन दिवसात शिवनेरीवर जाऊन शिवरायांसमोर नतमस्तक होणार आहे. 

दरम्यान, आजचा दिवस आनंदाचा आहे त्यामुळे आज मी राजकारणावर बोलणार नाही अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.  

बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येणं स्वाभाविक
श्रीरामाच्या अस्तित्वापासून प्रश्न उपस्थित केले जात होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वांनी स्वीकारला आहे. आलेल्या निकालाकडे पाहताना एक मोठा कालखंड डोळ्यासमोरून जातो. अशात, जगातील सर्वांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येणं स्वाभाविक आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांनी 'गर्व से कहो हम हिंदू है' ही घोषणा बुलंद केली. राम मंदिराबद्दल बोलताना अशोक सिंघल, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अटल बिहारी वाजपेयी आणि रथयात्रेची सुरवात करणरे लालकृष्ण अडवाणी यांची आठवण येते. मी येत्या काही दिवसात अडवाणी यांना भेटायलाही जाणार आहे. 

उद्धव ठाकरे जाणार अयोध्येला.. 
गेल्या २४  नोव्हेंबर रोजी अयोध्येला गेलो होतो, शरयू किनारी मी आरती केली होती. शिवजन्मभूमीतील माती घेऊन मी गेलो होतो. मला चमत्कार घडेल हा विश्वास होता. आज, मी जाऊन येण्याच्या वर्षभरात निकाल आलाय   

आनंद साजरा करा, पण.. 
आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. आनंद साजरा करत असताना समजूतदारपणा दाखवा. आपलं पाऊल वाकडं पडू देऊ नका असा आदेश उद्धव ठाकरे यांनी सर्वांना दिलाय. 

WebTitle : shisvena party chief uddhav thackeray on supreme courts ayodhya verdict

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com