शरद पवारांसह शिवेन्द्रसिंह राजे आणि उदयन राजे यांचा एकाच गाडीतून प्रवास

शरद पवारांसह शिवेन्द्रसिंह राजे आणि उदयन राजे यांचा एकाच गाडीतून प्रवास

सातारा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजांत पुन्हा एकदा मनोमिलन होण्याची चर्चा सुरु असतानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले असता दोन्ही राज्यांना एकाच गाडीत घेत प्रवास केला.

साताऱ्यात दोन्ही राजांच्या मनोमिलनाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील मुहूर्त ठरविण्यात आला असून योध्दा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन राजांची मने एकत्र करण्याचा प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांना साकडे घालण्यात आले आहे. याबाबत सध्या दोन्ही बाजूंच्या समर्थकांत जोरदार चर्चा असली तरी निष्ठावंतांना हे मनोमिलन रूचणार का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

शिवेंद्रसिंहराजे यांच्या एमएच.11.1111 या नंबर च्या गाडीतून शिवेंद्रराजे गाडी चालवत होते. तर, शरद पवार यांच्या शेजारील सीटवर बसले होते आणि पाठीमागे उदयनराजे बसले होते. उदयनराजे व शिवेंद्रराजे हे दोन्ही राजे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्वाचे चेहरे आहेत. त्यांच्यातील वादाच्या प्रसंगामुळे शरद पवार यांनी दोन्ही राजे एकत्र आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. यात त्यांना आता यश येताना पाहायला मिळतंय अस म्हणले तर काही वावग ठरणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com