शिवसेनेबाबत पृथ्वी बाबांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेबाबत पृथ्वी बाबांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : शिवसेनेबाबत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'शिवसेनेने २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता', त्यावेळी तो प्रस्ताव काँग्रेसनेच धुडकावला होता, असेही चव्हाण यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळपास ४० आमदारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपकडून धमक्या आणि आमिषे दाखविण्यात आल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. भाजप-सेनेतील वाद पाहता या परिस्थितीत आम्ही आमची भूमिका बदलण्याचे ठरविले आणि पर्यायी सरकारबाबत विचार सुरु केला. मी यात पुढाकार घेतला, त्यानंतर चर्चा सुरु झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी सांगितले.

२०१४ मधील राजकीय स्थिती पाहता भाजपला रोखण्यासाठी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याकडे संपर्क साधला. मात्र, मी तातडीने हा प्रस्ताव फेटाळला. राजकारणात जय-पराजय असतातच, आम्ही निवडणूक हरल्याने विरोधात बसणार हे त्यावेळी स्पष्ट केले होते. आताही शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली, असे चव्हाण यांनी सांगितले.

भाजपने विरोधकांना संपविण्याचा केलेला प्रयत्न आणि शिवसेनेचा केलेला विश्वासघात यामुळे शिवसेना आमच्यासोबत आली असून आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचे एकमेव उदिष्ट्य असल्याने महाविकासआघाडीचे सरकार टीकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रिपदाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, 'जबाबदारी स्वीकारली नसल्याबाबत विचारले असता, काहीशा दुय्यम स्थानावर काम करणे मला योग्य वाटले नाही, असे चव्हाण म्हणाले. विधासभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव मला देण्यात आला होता. मात्र राजकारणात सक्रिय रहायचे असल्याने मी तो मान्य केला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title sena wanted form govt alliance congress after 2014 says prithviraj chavan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com