दिग्गज न्‍यूज चॅनल्‍सना वेगाने मागे सारत 'साम टीव्‍ही 'न्‍यूज नंबर २ वर

दिग्गज न्‍यूज चॅनल्‍सना वेगाने मागे सारत 'साम टीव्‍ही 'न्‍यूज नंबर २ वर

मुंबई : 'सकाळ' माध्‍यम समूहाचा भाग असलेलं 'साम टीव्‍ही न्‍यूज चॅनल' गेले काही महिने वेगानं लोकांच्‍या पसंतीला उतरत आहे. बार्क(BARC) या संस्‍थेच्‍या 24 व्‍या आठवड्याच्‍या रेटिंगनुसार दिग्गज न्‍यूज चॅनल्‍सना मागे सारत साम टीव्‍ही न्‍यूज नंबर २ वर पोहचलंय .

या आठवड्यात 20. 7 टक्‍के प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे यातून महाराष्‍ट्रातल्‍या 15 वर्षांवरील महिला आणि पुरुष प्रेक्षकांमध्‍ये साम टीव्‍ही न्‍यूज लोकप्रिय होत असल्याचं सिध्द झालंय .

साम टीव्‍ही न्‍यूज चॅनल गेले काही महिने सातत्‍यानं आणि वेगानं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतंय . बार्कच्‍या 24 व्‍या आठवड्याच्‍या प्रेक्षकांच्या रेटिंग नुसार झी 24 तास, नेटवर्क 18 लोकमतसारख्‍या प्रस्‍थापित न्‍यूज चॅनल्‍सना मागे टाकण्‍याची किमया साधली आहे.

सर्व न्‍यूज चॅनल्‍सच्‍या बातमीपत्रांमध्‍ये साम टीव्‍ही न्‍यूजचे "टॉप 50 न्‍यूज" आणि "इथे नोकरी मिळेल" हे दोन्ही कार्यक्रम टॉप १०० कार्यक्रमात सर्वोत्‍कृष्ट ठरले आहेत . याशिवाय व्‍हायरल सत्‍य, स्‍पॉटलाइट, सरकारनामा 360, आज काय विशेष, मेगा प्राइम टाईम, ही बातमीपत्रंही विशेष पसंत केली जात आहेत. सामच्या निष्पक्ष बातमीपत्रातूनच ही किमया साधली गेली आहे .

समाजमाध्‍यमांमध्‍ये वाट्टेल त्‍या गोष्‍टी पसरवून सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याच्‍या मानसिकतेला लगाम घालण्‍याच्‍या हेतूनं 'व्हायरल सत्य' हा कार्यक्रम साम टीव्‍हीनं सुरु केला आणि आता या कार्यक्रमातून साम टीव्हीची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झालीय.

युवक , महिला आणि कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी राखून वाहिनीनं नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मक समाज निर्मितीला आपल्या कार्यक्रमांमधून प्राधान्य दिलं आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com