'…म्हणून भारताने Air Strike साठी केली बालाकोटची निवड'

 '…म्हणून भारताने Air Strike साठी केली बालाकोटची निवड'

नवी दिल्लीः देशाच्या वेगवेगळया भागत आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी बालकोटमधील जैशे महंमदच्या तळावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. त्यासाठी आत्मघातकी हल्लेखोरांना तयार करण्यात येत होते. याबाबतची माहिती खात्रीलायक गुप्तचरांकडून मिळाली होती. त्यामुळे तेथे कारवाई आवश्यक होती. या कारवाईत भारताने जैशे महंमदचा सर्वात मोठा तळ उडवला आहे, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले आहेत. या घटनेला आज 12 दिवस होत असतानाच भारतीय हवाई दलाच्या मिराज या 12 विमानांनीच पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला. इंडियन एअर फोर्सने 'पीओके'मधील बालकोट येथे हवाई हल्ला करुन जैशे मंहमदचा सर्वात मोठा तळ नष्ट केला आहे. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

जैशचा म्होरक्या मसूद अझरचा मेहुणा मैलाना युसूफ अझहर हा कॅम्प चालवत होता. जैशच्या तळांवरच हा हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्यावेळी सर्वसामान्यांना झळ बसणार नाही, याची काळजी घेण्यात आली. जंगलातील आतील भागात हे तळ होते. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत पूर्णपणे कटिबद्ध आहे, असेही गोखले यांनी सांगितले.

Web Title: marathi news reason behind india selected balakot for air strike 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com