राज ठाकरे आणि आम्ही समविचारी - महाजन, मनसे भाजपात जाणार?

राज ठाकरे आणि आम्ही समविचारी - महाजन, मनसे भाजपात जाणार?

मुंबई: राज ठाकरे आणि आम्ही समविचारी आहोत, आम्ही भविष्यात एकत्रित येवू शकतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस- राज ठाकरे भेटीसंबंधी बोलताना महाजन म्हणाले, भेट झाली हे खरे आहे, पण चर्चा काय झाली, हे मला माहित नाही. कारण त्या भेटीनंतर माझी फडणवीसांशी याविषयी चर्चा झालेली नाही. राजकीय भेटीगाठी या होतच असतात. राज ठाकरे आणि आम्ही समविचारी आहोत. शिवसेना काँग्रेसबरोबर जावू शकते तर राजकारणात काहीही होवू शकते. मनसे तर समविचारी आहे, आम्ही एकत्रित येवू शकतो.

धुळे जिल्हा परिषदेत भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याबद्दल स्थानिक नेत्यांचे अभिनंदन करून महाजन म्हणाले, राज्यात एका पक्षाने मिळवलेले हे मोठे यश आहे. महाआघाडीतील कोणत्याही एका पक्षाला असे यश मिळवता आलेले नाही. 

दरम्यान, पालघरमध्येही मनसे आणि भाजप युती साकारली गेली तरी राज्यातल्या युतीसाठी भाजपच्या काही अटी आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्याबाबतचं सुतोवाच केलंय. राज ठाकरेंना जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य असेल तर मनसेबाबत विचार केला जाऊ शकतो, असं मुनगंटीवार म्हणालेत. 

Web Title - Raj thakare going with bjp? girish mahajan statement about raj thakare

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com