राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा..

राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींवर निशाणा..

मुंबई - 2014 मध्ये खोटी आश्वासने देऊन भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. पण 2019मध्ये तसं होणार नाही, असे राज ठाकरेंनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या नव्या व्यंगचित्रातून पुन्हा मोदी सरकारवर टीका केली आहे. 2014 मध्ये खोटी आश्वासनं देत भाजपाने सत्ता मिळवली. परंतु, 2019 मध्ये तसं होणार नसल्याचे राज यांनी सांगितले आहे. भारतमाता पुन्हा मोदींना ओवाळणी देणार नसल्याचे त्यांनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका सादर केली आहे. यामधील आजचे व्यंगचित्र त्यांनी भाऊबीजनिमित्त रेखाटले आहे. यात मोदी आणि भारतमातेला दाखवण्यात आले आहे. भारतमातेकडून ओवाळून घेण्यासाठी मोदी पाटावर बसल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, भारतमातेसमोर 2014 मधील आश्वासनं आणि 2018 मधील परिस्थिती दाखवण्यात आली आहे. 2014 मध्ये मोदींनी 5 वर्षात देशात 100 स्मार्टसिटी, पाकिस्तानला धडा शिकवणार, भ्रष्टाचारी काळे पैसेवाले पकडणार, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार, गंगा साफ करणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, अशी आश्वासनं दिली. पण 2018 उजाडला तरीही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, असे या व्यंगचित्रातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

2018 मध्ये राफेल भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, रुपयाची ऐतिहासिक घसरण, निवडणूक आयोगाचीही गळचेपी, अशा अनेक मुद्यांना या व्यंगचित्रातून हात घालण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com