उजनी धरणात 87 टक्के पाणीसाठा; धरण दोन दिवसांत पूर्ण भरण्याची शक्यता

उजनी धरणात 87 टक्के पाणीसाठा; धरण दोन दिवसांत पूर्ण भरण्याची शक्यता

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात 46.97 अब्ज घनफुट (टीएमसी) (87.68 टक्के) पाणीसाठा झाला आहे.

दौंड येथील भीमा नदीतून पाण्याचा विसर्ग मोठया प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे सुमारे 54 टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले उजनी धरण दोन दिवसांत पूर्ण भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. सध्या उजनी धरणाच्या सांडव्यातून सोलापूरसाठी एक हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

उजनी धरण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 53.59 टीएमसी इतकी आहे. पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणाचे 16 दरवाजे 1.75 मीटरने उचलून भीमा नदीत 70 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील 18 धरणक्षेत्रांत मुसळधार पाऊस पडत असल्याने दौंड येथून 2 लाख 18 हजार 253 क्‍युसेक पाणी भीमा नदीत मिसळत आहे. 4 ऑगस्ट रोजी 1 लाख 91, 5 ऑगस्ट रोजी सकाळी 2 लाख 14 हजार, तर दुपारी 4 वाजता 2 लाख 18 हजार 253 क्‍युसेक पाणी धरणात आले.

Web Title: Ujani dam water storage now 87 percent

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com