खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्याहून कमी; पाणीसाठा पोहोचला ४९ टक्‍क्‍यांवर

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्याहून कमी; पाणीसाठा पोहोचला ४९ टक्‍क्‍यांवर

पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्याहून कमी म्हणजे ४९ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. आणखी सहा महिने जुलैअखेर हे पाणी पुरवावे लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या प्रकल्पात पाणीसाठा पाच अब्ज घनफूटने (टीएमसी) कमी असूनही पाण्याचा वापर पूर्वीसारखाच सुरू आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

 कालवा समितीकडून दरवर्षी १५ जुलैअखेरपर्यंतचे पाणी वितरणाचे नियोजन केले जाते. त्यानुसार पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासह  ग्रामीण भागात शेती आणि उपसा सिंचन योजनांसाठी पाणी दिले जाते. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या पाणीसाठा १४.३३ टीएमसी इतका आहे. त्यात खडकवासला धरणात १.११ टीएमसी, पानशेत ५.९४ टीएमसी, वरसगाव ७.२४ टीएमसी आणि टेमघर धरणात ०.४ टक्‍के इतका पाणीसाठा आहे.

रब्बी हंगामाच्या पिकांसाठी कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला प्रतिदिन ८९२ एमएलडी पाणी घेण्याचे निर्देश दिले आहेत; परंतु महापालिकेकडून दररोज १३५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी घेतले जात आहे. त्यामुळे जलसंपदा अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात खडकवासला धरणातील दोन पंप बंद केले होते. मात्र, शहर आणि लगतच्या गावांमधील वाढती लोकसंख्या पाहता इतके पाणी पुरेसे होणार नाही, असा मुद्दा महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे मांडला. परिणामी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार, धरणात पुरेसा साठा असेपर्यंत नियोजनानुसार पाणी वापर करणे आवश्‍यक आहे. महापालिकेने दररोज १३५० एमएलडी पाणी घेतल्यास येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट तीव्र होईल.

Web Title: Residents of Kadakwasla will have to face water scarcity this summer

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com