Loksabha 2019: नातवासाठी शरद पवारांची माघार; मावळमधून लढणार पार्थ पवार

Loksabha 2019: नातवासाठी शरद पवारांची माघार; मावळमधून लढणार पार्थ पवार

पुणे- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि सर्वच पक्षाची उमेदवार जाहीर करण्यासाठी गडबड सुरु झाली. अनेक दिवसांपासून मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा चालू होती. 

मात्र शरद पवार यांनी अनेकदा पार्थ निवडणुक लढणार नसल्याचेही सांगितले. याच काळात पार्थ सातत्याने मावळ लोकसभा मतदारसंघात फिरताना दिसत होते. या सर्व गोष्टी पाहून अखेर आज (ता.11) शरद पवार यांनी पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा निवडणुक लढवावी ही सर्वांची इच्छा आहे, असे म्हणत पार्थ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

मधल्या काळात शरद पवार यांचे नाव माढा लोकसभा मतदार संघातून पुढे करण्यात आले होते. परंतु, माढ्यातून शरद पवार, बारामतीतून सुप्रिया सुळे आणि मावळमधून पार्थ पवार असे एकाच कुटुंबातील लोकसभेसाठी तीन-तीन उमेदवार होत होते आणि यावरून पवार यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत थेट प्रश्नही करण्यात आले. 

आज पवारांनी पूर्ण स्पष्टीकरण देताना म्हटले की, मी माढ्यातून निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केलेली‌ नाही. तसेच, आम्ही कुटुंबात बसून चर्चा केली. मी स्वत: उभं न राहता नव्या पिढीला संधी द्यायचं ठरवलं. पार्थ पवारला उमेदवारी द्यावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे एका घरातील किती उमेदवार द्यायचे असा प्रश्न होता, त्यामुळे मी पार्थला संधी द्यायचं ठरवलं.

म्हणजेच पार्थ लढणार असतील तर शरद पवार नाही आणि पवार लढणार असतील तर पार्थ नाही हे नक्की होते. उमेदवारीची लढाई तर पार्थ पवार यांनी जिंकली पण आता पार्थ मावळ लोकसभेची निवडणुक कशी जिंकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

त्याचबरोबर, हारण्याच्या भीतीपोटी माघार घेण्याच्या गोष्टीवर पवारांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मी आतापर्यंत चौदा निवडणूका लढलो आहे. आतापर्यंत कधीही अपयश बघितलेले नाही. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच नाही. चौदा निवडणूकांमधे मी कधी माघार घेतलेली नाही तर आता माघार कशासाठी घेईन?

ही माघार अन्य कोणासाठी नाहीतर फक्त पार्थसाठीच आहे हे मात्र नक्की !

Web Title: Parth Pawar will Confessed From Maval Loksabha constituency

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com