आता कॉसमॉस बँकेचे 14 कोटी परत मिळण्याची शक्यता

आता कॉसमॉस बँकेचे 14 कोटी परत मिळण्याची शक्यता

पुणे : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी हॉंगकाँग बँकेद्वारे 14 कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी काढण्याचा प्रयत्न केला होता. ही रक्कम हॉंगकाँग बँकेकडून मिळावी, यासाठी कॉसमॉस बँक व पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून पाठपरावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता कॉसमॉस बँकेचे 14 कोटी रुपयांची रक्कम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

ऑगस्ट 2018 मध्ये कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्विचवर सायबर गुन्हेगारानी मालवेअर अटॅक केला होता. त्यामध्ये तब्बल 94 कोटी 42 लाख रुपयांची रक्कम विविध देशांमधून काढण्यात आली होती. त्यापैकी 14 कोटी रुपयांची रक्कम हॉंगकाँग बँकेमध्ये पाठविली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने संबंधित रक्कम गोठविन्यात यावी, यासाठी बँकेला ईमेल पाठविला होता. त्यानुसार बँकेने रक्कम गोठविली होती. दरम्यान ही रक्कम मिळावी, यासाठी कॉसमॉस बँक व सायबर पोलिसांकडून त्यांच्याशी ईमेलद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला होता. आता ही रक्कम मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

याविषयी सायबर व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, "सायबर हल्ला प्रकरणातील हॉंगकाँग बँकेतील 14 कोटी रुपयांची रक्कम तत्काळ गोठविली होती. त्यानंतर ही परत मिळावी, म्हणून कॉसमॉस बँक व सायबर पोलिसांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आता ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे."

Web Title: Cosmos Bank cyber attack case HongKong bank may be returns 14 crore

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com