#Encounter | चौकशीसाठी आम्ही तयार आहोत - व्ही. सी. सज्जनार

sajjanar ips
sajjanar ips

आजची सकाळ उजाडली ती हैद्राबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियांका रेड्डी यांच्या आरोपींच्या एन्काउंटरच्या बातमीने. एकीकडे देशभरातून एन्काउंटरचं स्वागत केलं जातंय. तर काही जणांकडून सर्व प्रकार चुकीच्या पद्धतीने हाताळला गेल्याची भावना देखील व्यक्त केली जातेय. अशातच ज्या पोलिसांनी हे एन्काउंटर केलं त्यांनी माध्यमांसमोर येत घडलेल्या सर्व प्रकारावर त्यांची बाजू मांडली. नक्की सकाळी काय झालं ? कसं झालं याची माहिती दिली.  

काय म्हणालेत पोलीस अधिकारी? 

  1. आरोपींनी डॉक्टर प्रियांका रेड्डी यांचा मोबाईल जमिनीत पुरला होता
  2. मोबाईल शोधण्यासाठी आणि एकूण प्रकार कशाप्रकारे गुन्हा घडला याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेलं होतं 
  3. घटनास्थळी नेताच या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, यामध्ये यातील आरिफ नावाच्या आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावली
  4. या आरोपींनी पोलिसांवर दगड देखील फेकून मारले
  5. घटनास्थळी चारही आरोपी आणि पोलिसांमध्ये पाच ते दहा मिनिटं चकमक झाली
  6. पोलिसांनी या आरोपींना शरणागणी पत्करण्याचं आवाहन केलं. मात्र तसं न करता या आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. 
  7. स्वरक्षणासाठी पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. 
  8. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, त्यामुळे आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 
  9. सकाळी पावणे सहा ते सहा दरम्यान सदर प्रकार घडला
  10. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत
  11. या दोन्ही पोलिसांना केअर रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्यात आलंय.  
  12. एन्काउंटरच्या वेळी दहा पोलिस घटनास्थळावर हजर होते. 

WebTitle : press conference of telangana police on encounter of accused of dr priyanka reddy

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com