आज आणि उद्या विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार 

आज आणि उद्या विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार 

विदर्भ, कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावऱण पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी तर नागरिकांना सूर्यदर्शनही घडलेलं नाही. कोकणात अचानक आभाळ भरून आल्याने त्याचा आंब्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांवर अस्मानी संकट उभं राहिलं आहे. दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे आज आणि उद्या राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होणार असून दोन दिवसात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या काळात गारपीट अथवा वादळाची शक्यता नसून शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलंय. या काळात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींमुळे गहू आणि आंबा मोहोर यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन, शेतमालाचे नुकसान टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com