आता सरकारी नोकरीच्या परिक्षा द्या सीईटी द्वारे...

आता सरकारी नोकरीच्या परिक्षा द्या सीईटी द्वारे...

नवी दिल्ली : सध्या देशात मंदीची लाट असताना नोकरींच्या संधीही फारच मंदावल्या आहेत. लाखो तरुण शिकुनही बेरोजगार आहेत. शिकले नाही तर नोकरी नाही, असं म्हटलं जायचं मात्र आता शिक्षण असुनही नोकरी मिळत नाही. या सर्वात मोठ्या समस्येमुळे आजचा तरुण वर्ग खुप हैराण झालाय. त्याला यामुळे मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतंय. मात्र आता काहिसा दिलासा त्यांना मिळणार असल्याची चिन्हं दिसताय. 

सरकारी नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. आता  महाभरती होणार आहे. आणि या महाभरतीच्या परिक्षेचं स्वरुपही बदलणार आहे. परिक्षेची पद्धत थोडी सोपी करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केलाय.

 केंद्र सरकारमधील 'ब' आणि 'क' श्रेणीतील नोकऱ्यांसाठी सामायिक पात्रता परीक्षा म्हणजेच सीईटी घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. ही सीईटी एकाच संस्थेमार्फत घेण्याचाही विचार सुरू आहे. यूपीएससीसाठी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत  दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आयएएस, भारतीय परराष्ट्र सेवा आयएफएस, भारतीय पोलिस सेवा आयपीएस आणि भारतीय वन सेवा आयएफओएस तसेच 'अ' आणि 'ब' श्रेणीतील राजपत्रित पदांसाठीही या परीक्षा घेण्यात येतात. याशिवाय विशेषत: केंद्र सरकारमधील ब श्रेणीतील पदे भरण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परीक्षा घेतली जाते. या पद्धतीत सुधार आणण्यासाठी आता केंद्र सरकारने चांगला निर्णय घेतलाय. सीईटीद्वारे या परीक्षा घेण्याचा सरकारचा मानस आहे. ब श्रेणीतील राजपत्रित अधिकाऱ्यांची काही पदं, अराजपत्रित अधिकारी पदं आणि ब श्रेणीतील पदांसाठी या सीईटी घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी एकाच संस्थेकडे या परीक्षांचे व्यवस्थापन देण्याचाही सरकारचा विचार आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. यामुळे सरकारी संस्थांचा निधी वाचणार आहे. 

सध्या परिक्षकांना विविध परिक्षा द्याव्या लागतात. त्याचे विभागही वेगवेगळे असतात. काही परीक्षा ऑनलाइन तर स्किल टेस्ट या प्रकारे असतात. दरवर्षी साधारणपणे अडीच कोटी उमेदवार या परीक्षांना बसतात. आणि दरवर्षी केंद्र सरकारमध्ये सव्वा लाख पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. आता एकच संस्था सीईटी परीक्षा घेईल. आणि या परीक्षा ऑनलाइन होतील. याचा उमेदवारांनाही लाभ होईल. कारण सध्या अनेक परीक्षांसाठी उमेदवारांना परीक्षा फी भरावी लागते. एकाच संस्थेकडून परीक्षा घेतल्यास ग्रामीण भागातील उमेदवारांनाही त्याचा लाभ होईल, असा कार्मिक मंत्रालयाचा होरा आहे. त्यांचा खर्चसुद्धा वाचेल. त्यामुळे हा निर्णय सरकार आणि विद्यारथ्यांच्या दृष्टीने चांगला असल्याचं कळतंय.

नोकरीच्या संधी

केंद्रीय विभाग - ६ लाख ८३ हजार ८२३ पदं 

 ५ लाख ७४ हजार २८९ जागा क श्रेणी

 ८९ हजार ६३८ जागा ब श्रेणी

 १९ हजार ८९६ जागा अ श्रेणी 

Web Title - Now government Exams held by CET.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com