निवडणूक निकालात नाही दिसला राज फॅक्टर; राज ठाकरेंचा प्रभाव शून्यच

निवडणूक निकालात नाही दिसला राज फॅक्टर; राज ठाकरेंचा प्रभाव शून्यच

राज ठाकरेंच्या लाव रे व्हिडीओला भाजपनं लावरे फटाके. वाजव रे ढोल असं जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. लोकसभा निवडणूक प्रचारात राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडीओन धुमाकूळ घातला होता, राज ठाकरेंनी मुंबई,ठाण्यासह राज्यात  झंझावती10 सभा घेतल्या, निवडणुकीदरम्यान विरोधकांपेक्षा राज ठाकरेंच्या सभांची चर्चा झाली, राज  ठाकरेंनी घेतलेल्या भाजपविरोधी आक्रमक भूमिकेचा काँग्रेसला-राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता.

प्रत्यक्षात मात्र राज ठाकरेंचा निवडणूक निकालांवर प्रभाव पडलेला नाही, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडासाफ झालाय. विशेष म्हणजे मुंबई-ठाणे, नाशिक, पुणे या मनसेचा प्रभाव असणाऱ्या क्षेत्रातही राज ठाकरेंची जादू चालली नाही. या ठिकाणी शिवसेना-भाजपला मोठं यश मिळालय.

राज ठाकेरंच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होतं नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. मनसेनं लोकसभेच्या मैदानात एकदी उमेदवार उतवला नव्हता.. मात्र तरिही राज ठाकरेंनी, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, रायगड, काळाचौकी, भांडूप, पनवेल, नाशिकमध्ये सभा घेतल्या. यापैकी रायगड आणि सातारा वगळता इतर सर्व ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झालाय. राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेला विधानसभा निवडणुकीशी जोडलं जातं होतं. इतकच नाही तर राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यासाठी राष्ट्रवादी वकिलीही करत होती.

लोकसभा निकालानंतर आता मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com