निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची गुगली : मोदी

निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची गुगली : मोदी

प्रश्‍न : तुम्ही पुन्हा पंतप्रधान झालात तर भारत-पाक संबंध सुधारतील असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच म्हटले आहे, याकडे आपण कसे पाहता?

उत्तर : इम्रान खान पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांनी मोदींचा भरपूर उपयोग केला. त्यांनी नवाझ शरीफ यांना कसं लक्ष्य केलं होतं, तेही लक्षात घ्या. त्या वेळी त्यांची घोषणा काय होती, ‘मोदी का जो यार है, वो गद्दार है, गद्दार है’. मुळात इम्रान एक क्रिकेटपटू आहेत गुगली चेंडू कसा टाकायचा हे त्यांना चांगलं कळतं. भारतातल्या निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी त्यांनी टाकलेली ही गुगली आहे. त्याहून अधिक काही नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

Web Title: Narendra Modi opens up about India Pak relations in an exclusive interview with Abhijit Pawar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com