VIDEO | ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांच्या वाट्याला आली 'ही' खाती

Uddhav Thackeray , Shivsena
Uddhav Thackeray , Shivsena

ठाकरे सरकारने आपलं खातेवाटप अखेर जाहीर केलंय. यामध्ये गृह खाते शिवसेनेने स्वतःकडे ठेवल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार याबद्दल सातत्त्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विचारणा केली गेलेली. आता अधिवेशनापूर्वी याबाबत स्पष्टता येताना पाहायला मिळतेय. येत्या १६ तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.  

एकनाथ शिंदे
गृह, नगरविकास, वन पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदु व जलसंधारण, पर्यटन , सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम ) संसदीय कार्य, आणि माजी सैनिक कल्याण खाते 

सुभाष देसाई :  
उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना , फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्विकास, बंदरे आणि खर भूमी विकास

छगन भुजबळ 
ग्रामविकास , जलसंपदा ब लाभक्षेत्र विकास , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन. 

बाळासाहेब थोरात
महसूल, उर्जा व अपारंपरिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशु संवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय

जयंत पाटील  
वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास. 

नितीन राऊत 
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून ) आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.   

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग सांभाळणार आहेत. दरम्यान, हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचं बोललं जातंय.  

Web Title: Uddhav Thackeray announces assigns roles and duities of their ministers

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com