VIDEO | महाराष्ट्रातील आताच्या परिस्थितीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar Press Conference , Sharad pawar , Sharad pawar On Current political Situation
Sharad Pawar Press Conference , Sharad pawar , Sharad pawar On Current political Situation

मुंबई : मुंबईत सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी रिपाई नेते रामदास आठवले यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेवर भाष्य केलंय. महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोधात बसायचा कौल दिला आहे. अशात NCP विरोधातच बसणार असं, शरद पवार यानी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय. याचबरोबर त्यांनी भाजप आणि शिवसेनेला समंजसपणा दाखवण्याचा सल्लादेखील दिला आहे. 

या दरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्रात आता पुढे काय होऊ शकतं? यावरही मोठं विधान केलंय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते मात्र मध्यावधी निवडणुका लवकर लागणार नाहीत असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. 

शरद पवारांच्या प्रेस वार्ता मधील महत्त्वाचे मुद्दे :  
महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्यात इतके दिवस सरकार स्थापन होऊ नये ही गंभीर बाब.. 
महाराष्ट्रात अशी परिस्थिती जास्त दिवस राहू नये.. 
महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर नक्की काय तोडगा काढला जाऊ शकतो यावर बोलण्यासाठी रामदार आठवेल मला भेटले..
शिवसेना आणि भाजपने लवकर सरकार स्थापन करावं..
शिवसेना आणि भाजपने समंजसपणा दाखवावा आणि महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यावं..
आम्हाला विरोधात बसण्याचा कौल महाराष्ट्रातील जनतेने दिलाय. आम्ही विरोधातच बसणार  
राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला बोलवत का नाहीत? हे मला समजू शकलेलं नाही  
आमचा भाजप आणि शिवसेनेला राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्याचा सल्ला राहील, त्यामुळे महाराष्ट्रात  लवकर सरकार स्थापन करा
 

Web Title: sharad pawar on current political situation of maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com