हातात सत्ता असलेले हिमालयात जाऊन बसलेत : शरद पवार

हातात सत्ता असलेले हिमालयात जाऊन बसलेत : शरद पवार

मुंबई : "ज्यांनी देश चालवायचा ते हिमालयात जाऊन बसत आहेत. माध्यमांत एक्‍झिट पोलच्या नावाखाली सगळी नौटंकी सुरू आहे. अशा नौटंकीला घराच्या बाहेरच ठेवावे,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

इस्लाम जिमखाना येथे आज पवार यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. 

सध्या निवडणूक निकालाच्या अंदाजाबाबत चर्चा सुरू आहे, पण त्यामुळे घाबरून जायचे काम नाही. 23 तारखेला सगळे स्पष्ट होईल. सगळी नौटंकी उघड होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. "निवडणुका येतात व जातात. पण, हा देश बंधुभावाच्या नात्यात जपला पाहिजे. आपण देश जोडण्याचे प्रयत्न करत आहोत, तर सत्ताधारी नेते देशातले बंधुत्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनीच सावध राहून अशा संकटाचा सामना करायला हवा,'' असेही ते म्हणाले. ज्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी दिली ते हिमालयात जाऊन बसत आहेत. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारची नाटके होत असतात, असा टोलाही पवार यांनी लगावला. 

Web Title : Power is in hand and siting in Himalaya, Sharad Pawar to narendra modi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com