सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तुटलेला उजवा हात पुन्हा जोडला

सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तुटलेला उजवा हात पुन्हा जोडला

मुंबई : अंधेरी येथील कूपर रुग्णालयातील पालिका रुग्णालयात प्लॅस्टिक सर्जरीने रेल्वेखाली कापलेला उजवा हात अठ्ठावीस वर्षीय रुग्णाचा हात पुन्हा जोडला. तब्बल सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा दंडाशी जोडण्यात आला. 

गुजरातहून मुंबईत आलेल्या अठ्ठावीस वर्षीय धर्मेंद्र अंधेरी स्थानकात उभ्या असलेल्या लोकलमधून खाली पडला. या अपघातात उजवा हात लोकलच्या चाकाखाली आल्याने उजव्या दंडापासून हात पूर्णपणे वेगळा झाला. ही घटना रात्री नऊ वाजता घडली. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने धर्मेंद्रला तातडीने नजीकच्या कूपर रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर मध्यरात्री एक वाजता रुग्णालयातील डॉक्‍टरांनी धर्मेंद्रवर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. सकाळी आठ वाजता ही शस्त्रक्रिया संपली. 

सलग सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर धर्मेंद्रचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा उजव्या दंडाशी जोडला गेला. या शस्त्रक्रिया महिना उलटल्यानंतर आता धर्मेंद्रच्या हातांच्या संवेदनांमध्ये सुधारणा दिसून येत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ गणेश शिंदे यांनी दिली. कूपर रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जन विभागाचे डॉ नितीन घाग यांच्या नेतृत्वाखाली विभागातील डॉक्‍टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. वर्षभरात धर्मेंद्रचा हात पूर्ववत होईल. 

धर्मेंद्रला वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळेच रुग्णाचा तुटलेला हात पुन्हा जोडता आला. हातापायासारखा अवयव तुटला असल्यास त्या भागांतील रक्तप्रवाह थांबतो व अवयव निकामी होण्याची प्रक्रिया त्वरित सुरु होते. हात दंडापासून कापला गेला असेल तर चार तासांच्या आत रुग्णाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. 
- डॉ नितीन घाग, प्लास्टीक सर्जन विभाग, कूपर रुग्णालय

Web Title: plastic surgery on hand in Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com