किरीट सोमय्या यांच्या विरोधात संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय

किरीट सोमय्या यांच्या विरोधात संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने हळूहळू आपले उमेदवार निश्चित करायला सुरवात केली असून राष्ट्रवादीने ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. किरीट सोमय्या हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून त्यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चीत मानली जात आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत यंदा संजय दिना पाटील विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यात लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी गेल्या निवडणुकीतही या दोघांमध्येच लढत झाली होती, त्यावेळी सोमय्यांनी बाजी मारली होती.

ईशान्य मुंबईतील जागा राष्ट्रवादी लढवणार असून, ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांबरोबर शरद पवार संवाद साधणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून हा संवाद साधणार आहेत. ईशान्य मुंबईमध्ये सलग दोनवेळा कोणीही निवडून आलं नसून प्रमोद महाजनांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. 

ईशान्य मुंबईचा भाग मिश्र मतदारांचा असून मराठी, गुजराती, दलित, उत्तर भारतीयांसारखे सर्व मतदार यात आहेत. हे समीकरण ज्या पक्षाला जास्त चांगलं जमवता येईल त्याचा विजय निश्चित आहे. गेल्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपकडून ही निवडणूक लढवली होती पण मोदी लाटेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. पण आता समीकरणं बदलली असून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी कायम शिवसेना नेतृत्वाला टीकेचं लक्ष केल्याने निवडणुकीच्या माध्यमातून ती खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे.

2014 चे मतविभाजन
किरीट सोमय्या (भाजप) - 524895 (विजयी)
संजय पाटील (राष्ट्रवादी) - 208001  (पराभूत)

Web Title: NCP candidate declared against kirit somaiya

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com