माजी आमदार सुरेश साळोखे यांनी आज मुंबई येथे "मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार सुरेश साळोखे यांनी आज मुंबई येथे "मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर - माजी आमदार सुरेश साळोखे यांनी आज मुंबई येथे "मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंध बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. 

यावेळी मातोश्रीवर जिल्हा प्रमुख संजय पवार, माजी जिल्हा प्रमुख रवि चौगुले, दक्षिण संघटक अवधूत साळोखे, अनिल साळोखे, रविंद्र साळोखे, सचिन साळोखे, उमेश काशिद, दत्ता सावंत, प्रमोद माने, शितल माने, नागेश जाधव, आनंदा कदम आदी उपस्थित होते. 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुरेश साळोखे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवाडकर व संपर्क नेते व परिवहन मंत्री  दिवाकर रावते यांची भेट घेतली. 

सेनेचे मूळ कार्यकर्ते असलेले साळोखे सेनेच्या तिकिटावर दोनवेळा आमदार झाले. 2004 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे मालोजीराजे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर साळोखे सेनेपासून दूर झाले. खासदार नारायण राणे यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. राणे सेनेतून बाहेर पडल्यानंतर साळोखे यांच्यासमोरील अडचणी वाढत गेल्या. गेली विधानसभा निवडणूक ते मनसेकडून लढले होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने साळोखे यांनी पुन्हा शिवसेनेत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. 

आपलंच घर आहे, आपणच उभे केले 
शिवसेना ही माझ्या रक्तात आहे. दुसरीकडे कुठे जीव रमत नाही. आपलंच घर आहे, आपणच उभे केले आहे, अशी प्रतिक्रिया साळोखे यांनी यावेळी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

Web Title: Ex MLA Suresh Salokhe enter in Shivsena after 15 years

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com