माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता यांनी स्वीकारले भाजपचे सदस्य पद ?

 माजी क्रिकेटपटू आणि अभिनेता यांनी स्वीकारले भाजपचे सदस्य पद ?

मुंबई - तब्बल १८ लाख फॉलोअर्स असलेल्या ‘आय सपोर्ट मोदी’ या फेसबुक पेजवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, विराट कोहली आणि अभिनेता सनी देओल यांनी भाजपचे सदस्य स्वीकारल्याचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले आहे. या पोस्टला २६ हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले असून, १२ हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र, कोणत्याही क्रिकेटपटूंनी भाजपमध्ये प्रवेश केला नसून पोस्ट खोटी असून, लोकांमध्ये भ्रम निर्माण करणारी आहे.

राजकीय पक्ष निवडणुकीत प्रचारासाठी प्रसिद्ध कलाकार आणि क्रिकेटपटूंना आमंत्रित करतात. ही सर्वसामान्य बाब आहे. प्रचारावेळी संबंधित कलाकार किंवा खेळाडू त्या-त्या राजकीय पक्षाची टोपी, दुपट्टा परिधान करतात. तशाच प्रकारचा फोटो संबंधित पेजवरून पोस्ट करण्यात आला. मात्र, कोणत्याही क्रिकेटपटूने राजकीय पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नसल्याचे तपासात आढळून आले आहे. २०१४च्या निवडणुकीत गौतम गंभीर आणि सनी देओल यांनी भाजपच्या प्रचारात सहभाग घेतला होता. ही छायाचित्रे या पोस्टमध्ये वापरून गंभीर आणि देओल भाजपमध्ये सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला. विराट कोहली याचे छायाचित्र फोटोशॉप करून वापरण्यात आले आहे. पोस्टमध्ये वापरण्यात आलेले सचिनचे छायाचित्र तीन वर्ष जुने असून, ते सिद्धिविनायक मंदिरातील आहे. कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी झाल्याचे त्याने फेटाळून लावले. त्यामुळे भारतीय जनता पक्षात हे कलाकार आणि क्रिकेटपटू सहभागी झाल्याचा दावा अतिशय खोटा आहे.

Web Title: Cricketers and actors accepted BJP members ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com