Save Aarey | मेट्रोप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा 'हा' मोठा निर्णय

Uddhav Thackeray, Shivsena
Uddhav Thackeray, Shivsena

उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा पदभार

स्वीकारल्यावर मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. यामध्ये मुंबई संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.  पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोसाठी बनवण्यात येणाऱ्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. मुंबईतील आरेमध्ये मेट्रोचं कारशेड बनवण्यात येणार होतं.

आरे प्रश्नावरून देशभरात मोठी आंदोलनं करण्यात आली होती. एक रात्रीत आरेतील दोन हजारांच्यावर झाडांची कत्तल करण्यात आली होती. आरे कारशेडचा पूर्णपणे आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. आरेतील ही कत्तल मला चालणार नाही, रात्रीत केलेली कत्तल अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आता आरेमध्ये झाडं काय पानालाही कुणाला धक्का लावता येणार नाही म्हणत उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांना दणका दिलाय.

आरे कारशेडला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. कोणत्याही विकास कामाला स्थगिती नाही, मेट्रोला माझी स्थगिती नाही मात्र आरेतील कारशेडला स्थगिती देण्याचे आदेश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.     

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मंत्रालयातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. येत्या काळात काम करत असताना महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या योजना शेवटच्या माणसापर्यंत  पोहोचतायत का? याचा आढावा घेण्यासाठी सरकारला मदत करावी असं देखील उद्धव ठाकरे म्हणालेत. 

Web Title : CM uddhav thackeray puts stay on aarey metro car shed

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com