VIDEO | नाराज एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा; खडसे म्हणाले...

BJP, eknath shinde
BJP, eknath shinde

मुंबई : भाजपनेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनंतर भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची आज (ता. ०४) भेट घेतली. या भेटीनंतर ही भेट ही पारिवारिक भेट असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजाताई आणि रोहिणी खडसेंचा पराभवाची कारणे काय आहेत यावरही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, आगामी काळात ज्या कारणांसाठी पराभव झाला ती कारणे वरिष्ठांपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि वरिष्ठांनी याची नोंद घेऊन पक्षाविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे अशा स्वरूपाची ही चर्चा होती. आमच्यात कोणी नाराज नसल्याचेही खडसेंनी यावेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाविरोधी कामे करणारांची नावे दिली असून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असेही खडसे यावेळी म्हणाले.

मध्यस्थाची गरज नाही अनेकांमध्ये अस्वस्थता आहे ते, मी सांगितलं माझा आणि पंकजाचे एकच मत असल्याचेही त्यांनी सांगितले. दुर्दैवाने हे चित्र खरं आहे की ओबीसी बहुजन नेते आहेत ते त्या ठिकाणी निवडणुकीत हरले. पंकजा मुंडे, रोहिणी खडसे यांचा पराभव झाला तर बावनकुळे, तावडे, प्रकाश महेता अशा नेत्यांना तिकीट नाकारले तर काही ठिकाणी पाडण्यासाठीही प्रयत्न झाला.

निवडणूक व्यवस्थित लढवली गेली असती तर भाजपच्या १०५ पेक्षा अधिक जागा निवडून आल्या असत्या. महायुतीला जनतेने मतदान केलं होतं प्रमुख दोन घटक म्हणजे भाजप आणि सेना दोघांच्याही ठिकाणी समन्वय व्यवस्थित झाला असता दोन पावलं मागे गेले असते तर महायुतीचाच मुख्यमंत्री झाला असता. सेनेची एखादी मागणी मान्य केली असती तरी मार्ग निघाला असता, माझा रोख मुख्यमंत्र्यांवर असण्यापेक्षा जो प्रमुख आहे त्याच्यावर असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

पक्ष कधीच यासंदर्भात दोषी नसतो नेतृत्व भागीदार होतं तर अपयशातही भागीदार व्हायला हवं, पक्ष म्हणून नाही तर ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पराभव मान्य करायला हवा. आज विरोधी पक्षनेता फडणवीस झालेत त्यांचे आणि उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्यांचेही खडसेंनी अभिनंदन केले.

Web Title: BJP leader Eknath Khadase Speak After Meet Pankaja Munde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com