मुंबईच्या लोकलमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट

मुंबईच्या लोकलमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट

मोबाईल नाही असा माणूस सापडणं फारच कठीण.. महागडे मोबाईल वापरण्यात मुंबईकरांचा हात कुणीच धरणार नाही. पण मुंबईच्या लोकल प्रवासात मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलंय. प्रवाशांचे मोबाईल हातोहात लंपास करणारी टोळी सक्रिय झालीय.

दररोज शेकडो मोबाईल चोरीला जात असल्याचं सांगण्यात येतंय. मोबाईल चोरणाऱ्या टोळ्यांचीही खास भाषा, खास कोडवर्ड आहेत.  ज्या व्यक्तीचा मोबाईल चोरायचा आहे त्य़ाला कौआ म्हटलं जातं. तर प्रत्यक्ष मोबाईल चोरणाऱ्या चोराला मशीन म्हणून हाक मारली जाते.

प्रवाशांचं लक्ष विचलित करणाऱ्या टोळीतल्या सदस्याला ठेकेबाज म्हणतात. छप्परबाज हा प्रवाशाला भिडतो किंवा त्याच्याशी भांडण करतो, मालखाव म्हणजे चोरीचा मोबाईल ज्याच्याकडं जमा होतो ती व्यक्ती. तर, चोरीच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदली करणाऱ्याला माणसाला कलर पलटी म्हणतात.  मोबाईल चोरांच्या संघटीत साम्राज्यात अनेक टोळ्या आहेत. प्रत्येक टोळीची कार्यपद्धती वेगवेगळी आहे. प्रसंगी या टोळ्या प्रवाशांचा जीव घ्यायलाही मागं पुढं पाहत नाही. त्यामुळं रहा सावधान.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com