'इथल्या' मुलीशी लग्न करा आणि मिळवा दरमहा तीन लाख रुपये

'इथल्या' मुलीशी लग्न करा आणि मिळवा दरमहा तीन लाख रुपये

जगात असा एक देश आहे जिथल्या मुलींशी तुम्ही लग्न केलं तर तुम्हाला कोणतीही नोकरी किंवा धंदा करायची अजिबात गरज नाही. या देशातील मुलीशी तुम्ही जर लग्न केलं तर करायची ती फक्त ऐश. कारण, हा देश इथल्या मुलीसोबत जो कोणी लग्न करणाऱ्याला तब्बल तीन लाख रुपये देतो. पैशांसोबत इथलं नागरिकत्त्व पण मिळतंय बरंका. 

याबाबतची माहिती एका संकेतस्थळावर प्रकाशित केली गेलेली. त्यानुसार लग्न झाल्यावर पती आणि पत्नी दोघांनी या देशातच राहायला हवं. त्याचसोबत फक्त मुलालाच मुलगी पसंत पडायला नको तर, मुलीनेही मुलाला पसंती दिली पाहिजे.

पाहता, पाहता ही बातमी व्हायरल झाली आणि इथल्या मुलींनी फेसबुकवर अनोळखी मुलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला सुरवात केली. दरम्यान, हा सगळा प्रकार एव्हडा व्हायरल झाला आणि इथल्या सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

वाढता गोंधळ लक्षात घेत सरकारने अधिकृतरीत्या घोषण केली की, सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. हा सगळा प्रकार घडलाय आईसलॅंड या देशात. आईसलॅंड या देशात 1007 पुरुषांमागे 1000 स्त्रिया असं इथलं स्त्री पुरुषांचं प्रमाण आहे. त्यामुळे सदर व्हायरल बातमी खोटी असल्याचं समोर आलंय.    

WebTitle : marry Icelandic girl and get three lakh rupees 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com