मर्दानी 2 चा खतरनाक ट्रेलर पाहिलात का?

मर्दानी 2 चा खतरनाक ट्रेलर पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा पदार्पण करतेय. यावेळी ती पुन्हा बेधडक अवतारात दिसणार आहे. अर्थातच मर्दानी 2 चा खतरनाक ट्रेलर आलाय. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहा. कारण ट्रेलर पाहताना तुमच्या अंगावर शहारे आले नाही, तर नवलंच! यामध्ये भयंकर सस्पेेन्स थ्रीलरचा अनुभव येईल हे नक्कीच.

'मर्दानी-२'चा ट्रेलर रिलीज कालंच झाला आहे. चित्रपटाच्या  ट्रेलरमध्ये राणी मुखर्जीचा दमदार अभिनय पाहायला मिळतोय. यू-ट्यूबवर या चित्रपटाच्या ट्रेलरला लाखो व्ह्युज आहे. 'मर्दानी-२'च्या ट्रेलरमध्ये राणी मुखर्जी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतेय. सस्पेन्सने भरपूर असलेल्या या ट्रेलरमध्ये राणी मुखर्जी दमदर ॲक्शन करताना दिसत आहे. 

'मर्दानी-२' ला यशराज फिल्म्स बॅनरखाली बनवण्यात आले आहे. हा चित्रपट राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्राने प्रोड्यूस केला आहे. हा चित्रपट जिश्नू भट्टाचार्जीने दिग्दर्शित केला आहेय १३ डिसेंबर, २०१९ रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. 

महिलांच्या व्हॉइलंस रेपवर हा चित्रपट असल्याचं कळतंय.

Web Title - mardani 2 dangerous trailer.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com