मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळीच हाताळला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती - उदयन राजे

मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळीच हाताळला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती - उदयन राजे

पुणे - ''मराठा मोर्चे थांबले पाहिजेच म्हणता, मग मार्ग का काढत नाही? मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यावेळीच हाताळला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेळीच प्रश्न मार्गी लागले असते तर अनेकांची जीव गेले नसते'', असे मत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले. जगभरातील मिडियाने याची दखल घेतली. मराठा मोर्चे थांबले पाहिजेच म्हणता, मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच आजचे मोर्चे निघत आहेत. जी तत्परता ऍट्रॉसिटी कायद्याबाबत दाखवली, तिच तत्परात मराठा आरक्षणाबाबत का नाही? सर्वांची संमती आहे तर मग मराठा आरक्षणाला विलंब का? असे प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केले. परिस्थिती चिघळ्ण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप देखिल त्यांनी केला. 

सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. सरकारने आरक्षणाबाबत तातडीने मार्ग काढावा. केवळ अध्यादेश काढून प्रश्न सुटणार नाही. तर, त्यासाठी कायदाच करावा लागेल. मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाचे आरक्षण काढा, असे मी म्हणणार नाही. मराठा समाजासोबतच धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com